well subsidy : आता सरकार मार्फत मिळणार विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान, असा करा मोबाईलवर अर्ज ।well subsidy : मागेल त्याला विहीर या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार विहीर खोदण्यासाठी सरकार मार्फत 4 लाख रुपये अनुदान. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर विहीर खोदायची असेल तर तुम्ही देखील मागेल त्याला विहीर या योजने अंतर्गत सरकारकडून  4 लाख रुपये अनुदान मिळवू शकतात. तरी आज आपण, या लेखात मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज मोबाईलवर ऑनलाइन कसा भरायचा ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज कसा भरायचा ?
 • मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर उघडायचे आहे व सर्च करायचे आहे maha egs सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर MAHA-EGS Horticulture Well App या नावाचा ॲप येईल.
 • आता तुम्हाला मोबाईल मध्ये हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे.
 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये हे ॲप उघडायचे आहे.
 • ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी लॉगिन असा पर्याय येईल. त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुमच्या समोर तीन पर्याय येतील. त्यापैकी तुम्हाला विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्या समोर मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज उघडेल.
 • अर्ज उघडल्यानंतर त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.
 • अर्ज भरल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्ज जमा करा या पर्यावर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारला जाईल ते ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे.
 • त्याखाली तुम्हाला प्रस्तुत करा असा पर्याय दिसत असेल, त्या पर्यावरण तुम्हाला क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर अर्ज यशस्वीरीत्या भरण्यात आला आहे, असा मेसेज येईल.
शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज भरू शकता.

मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज भरण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या