7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने झाली वाढ7th pay commission : सरकार मार्फत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देण्यात आलेलं आहे. ते गिफ्ट म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने 4 टक्के वाढ केली आहे.

केंद्र सरकार मार्फत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षात दोन वेळा वाढ केली जाते. महागाई भत्ता वाढीची घोषणा केंद्र सरकार मार्फत मार्च महिन्यात व ऑक्टोबर महिन्यात केली जाते. मात्र यावर्षी एप्रिल व मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा सरकार मार्फत जानेवारी महिन्यातच केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती होणार वाढ ?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के महागाई भत्ता दिला जातो. त्या महागाई भत्त्यात सरकार मार्फत आता 4 टक्क्याने वाढ केली आहे. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के इतका महागाई भत्ता सरकार मार्फत दिला जाणार आहे. या महागाई भत्त्याचा लाभ देशातील 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.

कर्जमाफी लाभार्थी यादी पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या