Aadhar card SIM check तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? पहा मोबाईलवर ऑनलाईन



Aadhar card SIM check आपल्या नावावर सध्या किती सिमकार्ड सुरू आहेत ? ते मोबाईल वरती ऑनलाईन कसे चेक करायचं ? या विषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

आपल्या नावावरती सध्या किती सिम कार्ड सुरू आहेत ते मोबाईल वरती ऑनलाइन कसं चेक करायचं ?
1) प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये TAFCOP ही वेबसाईट उघडावी लागेल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून देखील तुम्ही ही वेबसाईट उघडू शकता.
2) वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला Enter your Mobile Number असा पर्याय दिसत असेल. त्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
3) क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे. तो मोबाईल नंबर टाकायचा आहे.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत चेक करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा

4) त्यानंतर त्याखाली तुम्हाला Request OTP असा पर्याय दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल.
5) आता तुमच्या समोर Please enter the OTP you have received असा पर्याय आला असेल, त्याच्या खाली रिकामी जागा असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमच्या मोबाईल वरती जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी येथे टाकायचा आहे.
6) त्यानंतर त्याखाली Validate असा पर्याय तुम्हाला दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुमच्या नावावरती किती सिमकार्ड आहेत ? या विषयीची माहिती तुमच्यासमोर येईल.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत चेक करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा

तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत ? ते मोबाईल वरती ऑनलाईन पाहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या