प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, आता मत्स्य पालन करण्यासाठी सरकार कडून मिळणार 60 टक्के अनुदान । PM Matsya Sampada Yojana 2022

सध्या अनेक शेतकरी मत्स्य पालन हा व्यवसाय करून लाखो रूपये कमवत आहेत. बर्‍याच शेतकर्‍यांना मत्स्य पालन हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. परंतू मत्स्य पालन कसे करावे ? या विषयी पुर्ण माहिती शेतकर्‍यांना नसते तसेच अनेक शेतकऱ्यांकडे मत्स्य पालन हा व्यवसाय करण्यासाठी पैसे देखील नसतात. त्यामुळे बरेच शेतकरी मत्स्य पालन हा व्यवसाय सुरू करत नव्हते. पण आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हि सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना मत्स्य पालन कसे करावे ? या विषयी प्रशिक्षण दिले जाते. तसेच मत्स्य पालन करण्यासाठी कर्ज देखील दिले जाते.



प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

या योजनेच्या माध्यमातून मत्स्य संगोपन करणे, क्षारयुक्त क्षेत्रात तलाव बांधणे, सागरी मत्स्यबीज संगोपन केंद्र उघडणे, सागरी मत्स्य शेती करणे व कोळंबी बीज उत्पादन केंद्र उघडणे अशा प्रकारची कामे केली जातात.

तुम्हाला मत्स्य पालन हा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तलाव भाड्याने घेवुन हा व्यवसाय करू शकता. तसेच स्वतःच्या शेतात शेततळे बनवून देखील तुम्ही मत्स्य पालन करू शकता.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 60 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे तुम्हाला जर मत्स्य पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या योजनेचा अर्ज तुम्ही नक्की भरा.
PM Matsya Sampada योजनेचा अर्ज भरण्यासाठी

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. CNC machinists will be among prime careers within the coming years. As mechanists practice on method to|tips on how to} function CNC machines, they should to} also practice to take care of up} them to enhance effectivity. As you'll be able to|you presumably can} see, the tasks that CNC CNC machining machines can achieve are all very particular machining operations.

    उत्तर द्याहटवा