CM Kisan Big Update : नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमानमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आपल्या बँक खात्यात कधी जमा होतील ? याची राज्यातील सर्वच शेतकरी वाट पाहत होते, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तारीख शिंदे सरकारने जाहीर केली आहे. तरी या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण पाहूयात.

नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी
👇👇👇


शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे यासाठी शिंदे सरकार मार्फत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जात आहेत. यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पात शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही नवीन योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते, तरी आता सरकार मार्फत नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला राज्य सरकार मार्फत दरवर्षी 6,000 रुपये दिले जाणार आहेत. हे 6,000 रुपये शेतकऱ्याला तीन हप्त्यात दिले जातील. प्रत्येक हप्त्यात सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा केले जातील. नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना दिला जाणार असून या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार मार्फत 6,900 कोटी रुपये इतके बजेट जाहीर करण्यात आले आहे.

नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार ?
पहिला हप्ता : एप्रिल ते जुलै
दुसरा हप्ता : ऑगस्ट ते नोव्हेंबर
तिसरा हप्ता : डिसेंबर ते मार्च

नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या