kharip pik vima : आता शेतकऱ्यांना मिळणार, फक्त एक रुपयात पिक विमा ।



kharip pik vima : शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पिक विम्याचा लाभ घेता येणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो आज आपण, या लेखात एक रुपयात पिक विमा योजना या विषयची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी
👇👇👇


प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण दिले जाते. ही योजना 2016 या वर्षापासून सुरू करण्यात आली होती. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना खालील बाबींसाठी विमा संरक्षण दिले जाते.
  • अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास.
  • वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास.
  • गारपीट मुळे पिकाचे नुकसान झाल्यास.
  • रोग पडून पिकाचे नुकसान झाल्यास.
अशा प्रकारच्या बाबींमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला सरकार मार्फत पिक विमा दिला जातो.

शेतकऱ्याला पिक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर पिक विमा हप्त्याची रक्कम भरावी लागायची. ही रक्कम 8,00 ते 1,000 रुपये इतकी असायची. परंतु आता पिक विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही, कारण महाराष्ट्र सरकारने फक्त एक रुपयात पिक विमा योजना ही लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा हप्त्याची जी रक्कम पिक विमा कंपनीस भरावी लागायची, ती रक्कम महाराष्ट्र सरकार भरणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी फक्त एक रुपयाच भरावा लागणार आहे.

पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी
👇👇👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या