Cibil Score सिबिल स्कोर चेक करा मोबाईलवर ऑनलाइन फक्त दोन मिनिटात



बँकेतून लोन घ्यायचे असेल तर आपला सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला बँक लोन देते. तरी आज आपण या लेखात सिबिल स्कोर म्हणजे काय ? सिबिल स्कोर मोबाईल वर कसा चेक करायचा ? तसेच सिबिल स्कोर कसा वाढवता येईल ? या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा.


सिबिल स्कोर म्हणजे काय ?


सिबिल स्कोर म्हणजे आपली क्रेडिट हिस्ट्री होय. सिबिल स्कोर हा 300 ते 900 यामध्ये मोजला जातो. 300 हा सर्वात कमी सिबिल स्कोर cibil score असतो, तर 900 हा सर्वात जास्त सिबिल स्कोर असतो. आपला सिबिल स्कोर 800 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला कोणतीही बँक लवकर कर्ज देण्यास तयार होते.


सिबिल स्कोर चेक करण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा


सिबिल स्कोर मोबाईलवर कसा चेक करायचा ?


  • प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये cibil.com ही वेबसाईट उघडायची आहे. या वेबसाइटची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला Get Your Free Cibil Score असा पर्याय दिसत असेल. त्यावर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला खाली दिलेली माहिती भरायची आहे.

  1. Full Name
  2. Date Of Birth
  3. Email ID
  4. Mobile Number
  5. Pin Code
  6. Aadhar Card Number

  • ही सर्व माहिती भरल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला Submit असा पर्याय दिसत असेल, त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा सिबिल स्कोर रिपोर्ट ओपन होईल.

तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोबाईल वरती ऑनलाईन पाहू शकता.


सिबिल स्कोर कसा वाढवता येईल ?


  • बँक खात्यात नेहमीच जास्त रक्कम जमा ठेवली पाहिजे.
  • एकाच वेळी अनेक प्रकारचे लोन घेऊ नये.
  • लोन घेतले असेल तर त्या लोन चा हप्ता वेळीच भरला पाहिजे.
  • संयुक्त कर्जाचा जामीनदार होऊ नये.

तर अशा प्रकारे सिबिल स्कोर वाढवता येऊ शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या