सुकन्या समृद्धी योजना सविस्तर माहिती Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना हि भारत सरकारने मुलींसाठी सुरु केलेली योजना आहे. हि योजना एक प्रकारची बचत योजना आहे. या योजनेचे खाते मुलीचे पालक बँकेत किंवा पोस्टात काढून घेवू शकतात. खाते उघडल्यावर त्या खात्यात मुलीच्या नावे दरवर्षी पालकांना पैसे जमा करावे लागतात. खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर ७.६ टक्के चक्रवाढ दराने ( Money Investment ) व्याज मिळते.


* सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१) मुलीचा जन्म दाखला
२) मुलीचे आधार कार्ड
३) मुलीचे पासपोर्ट फोटो
४) मुलीच्या आईचे व वडिलांचे आधार कार्ड

* सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आपण खालील पैकी कोणत्याही बँकेत उघडू शकतो.

- स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of India )
- बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra )
- बँक ऑफ इंडिया ( Bank Of India )
- आय डी बी आय बँक ( IDBI Bank )
- आय सी आय सी आय बँक ( ICICI Bank )
- ऍक्सिस बँक ( Axis Bank )
इत्यादी.

* योजनेच्या नियम व अटी

- खाते सुरु करते वेळी किमान २५० रुपये मुलीच्या नावे खात्यात भरावे लागतील.
- खात्यात दरवर्षी कमीत-कमी २५० रुपये भरावे लागतील.
- खात्यात दरवर्षी जास्तीत-जास्त १,५०,००० रुपये भरता येतील.
- खाते उघडण्यासाठी मुलीचे वय १० वर्षापेक्षा कमी असावे लागते.
- मुलगी १० वी पास झाल्यावर खात्यातून मुलीच्या शिक्षणासाठी पैसे काढता येतील.
- मुलीचे लग्न झाल्यावर खात्यातील पूर्ण पैसे मुलीला मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या