तुषार सिंचन अनुदान योजना २०२२ संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सध्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी सिंचन योजना या दोन योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत. या दोन योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचनासाठी सरकार कडून अनुदान दिले जाते.

sinchan-yojna
sinchan yojna

              तुम्हाला जर स्पिंकलर खरेदी करायचे असेल तर तुम्ही देखील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी सिंचन योजना या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही एका योजने अंतर्गत सरकार कडून सबसिडी घेवू शकता. तरी या लेखात आपण दोन्ही योजनांच्या विषयी सविस्तर माहिती पाहुयात.


१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना :

               हि योजना महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांसाठी आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जाते. अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ५५ टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान सरकार कडून दिले जाते.


* प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे आहेत.

- अर्जदार शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावे ६० गुंठ्या पेक्षा जास्त व ५ हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
- अर्जदार शेतकऱ्याने या योजनेचा अगोदर कधीही लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार शेतकऱ्याकडे सिंचनासाठी विहीर, तलाव किंवा बोर इत्यादी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी अनुसूचित जातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

* प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

- आधार कार्ड
- सात-बारा व आठ-अ उतारा
- बँक पासबुक
- वीज बिल
- स्पिंकलर खरेदी केलेले बिल

              प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा अर्ज तुम्हाला भरायचा असेल तर, तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरून ऑनलाईन भरू शकता.
अर्ज भरण्यासाठी लिंक - Maha DBT

२) नानाजी देशमुख कृषी संजीवनी ( Pocra ) सिंचन योजना.

          हि योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी नाही. जर तुमचे गाव या योजनेसाठी निवडलेले असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला ८० टक्के पर्यंत सरकार कडून अनुदान मिळते.

* पोकरा तुषार सिंचन योजनेसाठी पात्रता खालील आहेत.
- शेतकऱ्याकडे सिंचनासाठी पाण्याचा स्रोत ( विहीर, तलाव किंवा बोर इत्यादी ) उपलब्ध असावा.
- शेतकऱ्याला सिंचनाचे साहित्य BSI दर्जाचे घेणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याला ज्या पिकासाठी स्पिंकलर घ्यायचे आहे, त्या पिकाची नोंद सात-बारा उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.

* पोकरा योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली दिले आहेत.

- आधार कार्ड
- ७/१२ उतारा व ८-अ उतारा
- बँक खाते पासबुक

            नानाजी देशमुख कृषी संजीवनी सिंचन योजना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्या लिंक वरून तुम्ही तुषार सिंचनासाठी अर्ज भरू शकता.
अर्ज भरण्यासाठी लिंक - PoCRA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या